काव्या मारनने पाकिस्तानी खेळाडूवर उधळले कोट्यवधी; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..

काव्या मारन यांच्या ‘सनरायझर्स लीड्स’ने द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला २.३४ कोटींना खरेदी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Published On: 

Kavya Maran The Hundred: पाकिस्तानी खेळाडू खरेदीवरून वाद!

क्रिकेट आणि राजकारण भारतात कधीच वेगळं करता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. आयपीएलच्या लिलावात नेहमीच चर्चेत असणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन (Kavya Maran) सध्या एका नव्या आणि मोठ्या वादात अडकल्या आहेत. त्यांच्या एका निर्णयामुळे सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली असून, त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

झालं असं की, इंग्लंडमध्ये होणाऱ्या The Hundred 2026 स्पर्धेसाठी काव्या मारन यांच्या मालकीच्या ‘सनरायझर्स लीड्स’ संघाने थेट एका पाकिस्तानी खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलंय. ट्रेंट रॉकेट्सने लावलेली बोली मागे टाकत, सनरायझर्सने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याच्यावर १ लाख ९० हजार पौंड म्हणजेच तब्बल २.३४ कोटी रुपयांची भक्कम बोली लावली. विशेष म्हणजे, भारतीय मालकीच्या फ्रँचायझीकडून खरेदी होणारा अबरार हा या स्पर्धेतील पहिलाच पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे.

Kavya Maran The Hundred

भारत-पाक तणावामुळे भारतात पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी असताना, एका भारतीय मालकीच्या संघाने तिथे जाऊन त्याला खरेदी केल्याने चाहते संतापले आहेत. काव्या मारन यांना थेट आयपीएलमधून बाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

या वाढत्या वादानंतर अखेर बीसीसीआयला (BCCI) समोर यावं लागलंय. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केलंय. “हा विषय आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. ही खरेदी आयपीएलसाठी नसून एका परदेशी लीगसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे तो निर्णय सर्वस्वी त्या फ्रँचायझीचा आहे, यामध्ये बीसीसीआय काही करू शकत नाही,” असं शुक्ला यांनी स्पष्ट केलं.

२७ वर्षीय अबरार अहमदने आतापर्यंत पाकिस्तानसाठी ३८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून ५२ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या या १०० चेंडूंच्या स्पर्धेत मुंबई, लखनऊ, दिल्ली आणि हैदराबाद या चारही आयपीएल फ्रँचायझींचे संघ आहेत. पण अबरारच्या खरेदीवरून उठलेलं हे वादळ इतक्या लवकर शांत होईल अशी चिन्हं दिसत नाहीत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही