🕒 1 min read
क्रिकेटच्या मैदानात कधी कोणता ड्रामा पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. निमित्त ठरलंय ते आयपीएल २०२६ मधील सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना!
या सामन्यात सुरुवातीपासूनच अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला. आधी विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यातील शाब्दिक चकमकीने मैदानात ‘राजकारण तापलं’ होतं. पण आता एका नव्या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे.
Kavya Maran Angry Video
आरसीबीचा डावखुरा फिरकीपटू कृणाल पांड्या याच्या विचित्र गोलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन भडकल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. IPL 2026 मधील या ६७व्या सामन्यात कृणालने आपल्या दोन षटकांत फिरकीऐवजी चक्क बाउन्सरचा भडीमार केला.
अचानक येणाऱ्या या बाउन्सरमुळे फलंदाजही चांगलेच चक्रावून गेले. त्याची ही अजब शैली पाहून व्हीआयपी स्टँडमध्ये बसलेल्या काव्या मारन गोंधळल्या आणि त्यांनी थेट यावर आक्षेपच नोंदवला.
“हा माणूस काय गोलंदाजी करतोय? हे नियमांच्या विरुद्ध नाही का?” अशा शब्दांत त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते व्हिक्टरी व्यंकटेश यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. कॅमेऱ्यात कैद झालेली त्यांची ही रिअॅक्शन सध्या इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरतेय.
या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत तब्बल २५५ धावांचा डोंगर उभा केला होता. थेट टॉप २ मध्ये धडक मारण्यासाठी त्यांना हा सामना किमान ९० धावांनी जिंकायचा होता. म्हणजेच त्यांना आरसीबीला १६५ धावांवर रोखणं गरजेचं होतं.
मात्र, आरसीबीने २० षटकांत ४ बाद २०० धावांपर्यंत मजल मारल्याने, हैदराबादला ५५ धावांनी विजय मिळवता आला. परिणामी, नेट रनरेटचं गणित ३५ धावांनी चुकल्याने आता हैदराबादला एलिमिनेटर फेरीत खेळावं लागणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सोने-चांदीच्या दराला अचानक ब्रेक; ‘त्या’ जागतिक घडामोडींमुळे सराफा बाजारात मोठी खळबळ!
- कान्समध्ये आराध्याने ऐश्वर्याला टाकलं मागे; ‘त्या’ एका लुकने इंटरनेटवर उडवली खळबळ!
- ‘लाडकी बहीण योजना बंद करा, पण…’; गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला घरचा आहेर, जरांगे-लाड भेटीवरही कडाडून टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












