दादांनंतर जनता पोरकी होऊ नये म्हणून जबाबदारी स्वीकारली; अजितदादांच्या कामाबाबत सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली खंत

दादांनंतर जनता पोरकी होऊ नये म्हणून आपण ही जबाबदारी स्वीकारल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील चोपडज येथे ग्रामस्थांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Published On: 

Election Commission seeks clarification from Sunetra Pawar

चोपडज, 7 ऑक्टोबर: पुणे जिल्ह्यातील चोपडज (चोपडा) गावात शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या कार्याचा आणि बारामतीच्या विकासातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. आपला राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, मात्र दादांनंतर जनता पोरकी होऊ नये म्हणूनच आपण ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज लोकांना व्यक्तिगत लक्ष देणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. अजितदादांनी स्वतःला लोकांच्या प्रश्नांसाठी झोकून दिले, मात्र तरीही त्यांच्या कामाची किंमत केली जात नसल्याची खंत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. रानात घरे बांधायची आणि तिथे वीज आली नाही म्हणून ‘दादांनी काही केले नाही’ अशी त्यांच्या नावाने बोंब मारणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. बारामतीत पाणी कोणामुळे आले, याचाही विचार लोकांनी करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान ग्रामस्थ आणि शेतकरी सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर विविध स्थानिक प्रश्न मांडले. या प्रश्नांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. इथून पुढे काय करायचे याची जबाबदारी आपली असून, दादांसारखीच मीही कायम तुमच्यासाठी उभी राहीन, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

आपला राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, मात्र दादांनंतर जनता पोरकी होऊ नये म्हणूनच आपण ही जबाबदारी स्वीकारल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही