Share

EVM ला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा आसाममध्ये बॅलेट पेपरवरही पराभव; ४२ पैकी केवळ २ जागांवर विजय

सिलचर महानगरपालिकेत बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय, तर काँग्रेसला केवळ २ जागा. दुसरीकडे ईव्हीएम विरोधात विरोधकांचे मोठे आंदोलन.

Published On: 

India Today C Voter survey results

प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: ईव्हीएमला विरोध करत निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या काँग्रेसच्या मागणीला आसाममध्ये धक्का बसला आहे. आसाममधील सिलचर महानगरपालिकेची निवडणूक ईव्हीएमवर न होता बॅलेट पेपरवर घेण्यात आली. या निकालावरून, काँग्रेस बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीतही विजय मिळवू शकत नाही, असे मत हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केले आहे.

सिलचर महानगरपालिकेच्या एकूण ४२ जागांपैकी तब्बल ३२ जागा जिंकून भाजपने मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून त्यांना अवघ्या २ जागा मिळाल्या, तर उर्वरित जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

एकीकडे बॅलेट पेपरवर काँग्रेसचा पराभव झाला असताना, दुसरीकडे ईव्हीएमच्या माध्यमातून मते चोरली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. देशभरात सुरू असलेल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेला विरोध करत ती रद्द करण्यात यावी यासाठी विरोधी पक्षांनी मंगळवारी मोठे आंदोलन केले. या आंदोलनात राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे खासदार आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली.

काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएमला विरोध दर्शवत सातत्याने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे. ३० सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी केली होती.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सिलचर महानगरपालिकेच्या एकूण ४२ जागांपैकी भाजपने ३२ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ २ जागांवर विजय मिळाला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही