Share

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; जंतरमंतरकडे जाणाऱ्या खासदारांच्या बस पोलिसांनी अडवल्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरकडे जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या बस पोलिसांनी अडवल्या. यानंतर खासदारांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

Published On: 

CEC Gyanesh Kumar election commission headquarters

दिल्ली, 7 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ठाम असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन पुकारले आहे.

या आंदोलनासाठी विरोधी पक्षांचे खासदार तीन बसमधून जंतरमंतरच्या दिशेने निघाले होते. मात्र, पोलिसांनी या बस मध्येच अडवल्या. बस अडवण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी आता आरपारच्या लढाईची घोषणा केली असून, बस अडवल्यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी मंगळवारीदेखील दिल्लीमध्ये मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांतील सर्व प्रमुख नेते तसेच खासदार सहभागी झाले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही