Share

“एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, मी दादांसारखी नाही”; सुनेत्रा पवारांचा जगतापांना थेट इशारा

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना खडे बोल सुनावले आहेत. कारखान्याच्या चेअरमनपदाबाबतच्या अफवांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Published On: 

Sunetra Pawar at NCP meeting

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना थेट इशारा दिला आहे. नाव न घेता पुरुषोत्तम जगताप यांच्यावर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, “एकदा बाहेर ते कायमचं बाहेर, एवढं लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते. दादांसारखी मी नाही.”

अध्यक्षपदाबाबत पसरलेल्या अफवांवर बोलताना पवार यांनी स्पष्ट केले की, “चेअरमन हा सर्वसमावेशकच असेल. सर्वांच्या मर्जीनुसारच होईल. कोणी कुठलं कोणी आधीच ठरवलेलं नाही. निवडणूक होऊ द्या, नंतर बघू.” कोणत्याही चुकीच्या अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराचे आता केवळ 3 दिवस उरले आहेत. 9 तारखेला प्रचार संपणार असून, 11 तारखेला 21 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यामुळे प्रचाराने वेग घेतला असून, जाहीर सभांऐवजी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे.

या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. एका बाजूला सुनेत्रा पवार आणि जय पवार गावोगावी प्रचार करत आहेत, तर शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार एकाच दिवशी 20 गावांचे दौरे करत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीतून बंडखोरी करत पुरुषोत्तम जगताप यांनी भाजप नेते आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या साथीने तिसरे पॅनल उभे केले आहे.

 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही