Share

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण: युक्तिवादासाठी नीरज कौल यांची सुप्रीम कोर्टाकडे दोन दिवसांची मागणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून, वकील नीरज कौल यांनी युक्तिवादासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे.

Published On: 

Supreme Court hearing on Shiv Sena party symbol

प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील नीरज किशन कौल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी कोर्टाकडे आणखी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे.

कोर्टात बाजू मांडताना नीरज कौल यांनी सादिक अली प्रकरणाचा दाखला दिला. राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी अंतर्गत निवडणुका घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले. पक्षांतर्गत निवडणुका झाल्यामुळे पक्षाला लोकशाही मार्गाने कार्य करण्याचा अधिकार मिळतो, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

शिवसेनेने २०११ मध्ये निवडणूक आयोगाकडे आपली शेवटची पक्षघटना दिली होती, अशी माहिती कौल यांनी कोर्टाला दिली. यासोबतच, अपात्र ठरवलेले सदस्य पक्षातून बाहेर गेल्याच्या मुद्द्याकडेही त्यांनी सुप्रीम कोर्टाचे लक्ष वेधले.

दरम्यान, काल झालेल्या सुनावणीत नीरज कौल यांनी सुभाष देसाई प्रकरणासह इतर काही खटल्यांचे दाखले देत आपली बाजू मांडली होती.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील प्रकरणात युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी वकील नीरज कौल यांनी कोर्टाकडे आणखी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही