Share

मावळमध्ये महायुतीत धुसफूस; आमदार सुनील शेळकेंचा भाजपवर हल्लाबोल

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक भाजपमधील गटबाजीवर जोरदार टीका केली आहे.

Published On: 

MLA Sunil Shelke's murder plot foiled; 7 arrested with 9 pistols, SIT ordered.

प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. एका मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी स्थानिक भाजपमधील गटबाजीवर जोरदार टीका करत मित्रपक्षालाच लक्ष्य केले आहे.

मावळमध्ये सध्या भाजपचे तीन गट कार्यरत असल्याचा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. यातील दोन गट माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि रवींद्र भेगडे यांचे असून, तिसरा नवीन गट दलाल आणि लाभार्थ्यांचा असल्याचे शेळके यांनी म्हटले आहे.

भाजपच्या कार्यपद्धतीची खिल्ली उडवताना शेळके यांनी आरोप केला की, मुख्यमंत्र्यांसोबत फक्त फोटो काढायचे आणि काही पदरात पडले नाही की आंदोलन करायचे, अशी या गटांची स्थिती आहे. तसेच, अजित पवार आणि भाजपच्या विरोधात जी आंदोलने झाली, ती प्रत्यक्षात भाजपच्याच लोकांनी घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला. आपले राजकारण भाजपच्या या गटातटांवर अवलंबून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार सुनील शेळके यांच्या या थेट वक्तव्यानंतर आगामी काळात मावळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

आमदार सुनील शेळके यांच्या दाव्यानुसार, मावळमध्ये सध्या भाजपचे तीन गट कार्यरत आहेत. यातील दोन गट माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि रवींद्र भेगडे यांचे असून, तिसरा गट दलाल आणि लाभार्थ्यांचा आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही