Share

बारामतीत झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन; महाराष्ट्रावर शोककळा.

बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Published On: 

Ajit Pawar, Baramati, Plane Crash, NCP, Maharashtra Politics, Breaking News

पुणे – कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की आजची सकाळ महाराष्ट्रासाठी इतकी भयानक ठरेल. ज्या मातीने त्यांना लढायला शिकवलं, ज्या बारामतीने त्यांना ‘दादा’ म्हणून डोक्यावर घेतलं, त्याच बारामतीच्या आकाशात काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचं निधन झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार एका खाजगी विमानाने दौऱ्यावर असताना हा अपघात घडला. बारामती एमआयडीसी परिसराच्या जवळच हे विमान अचानक खाली कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. विमान जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि परिसरात आगीचे लोळ उठले. आवाजाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता इतकी भीषण होती की कोणालाही वाचवणं शक्य झालं नाही. प्रशासनाने आणि डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Death

राजकारणातली ‘दादा’गिरी संपली!

अजित पवारांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सडेतोड बोलणं, कामाचा उरक आणि प्रशासनावरची पकड, यामुळे Ajit Pawar यांचं एक वेगळं वलय होतं. “सकाळी लवकर उठून कामाला लागणारा नेता” म्हणून त्यांची ओळख होती. पण आजची त्यांची ही ‘एक्झिट’ चटका लावणारी आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला आहे.

सध्या घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय ताफा दाखल झाला असून, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक बिघाड की हवामानाचा फटका? याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, या घटनेने राज्यावर मोठी शोककळा पसरली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस काळा ठरला आहे. ज्या बारामतीने त्यांना अंगाखांद्यावर खेळवलं, तिथेच काळाने त्यांच्यावर घाला घातला. बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचं निधन झालं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही