Share

“….तर Santosh Deshmukh यांचा जीव वाचला असता,” जबाबातून धक्कादायक माहिती समोर

by MHD
Shivraj Deshmukh eyewitness Statement in Santosh Deshmukh murder case

Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे (Santosh Deshmukh murder case) संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडालीय. या हत्याप्रकरणाला चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही.

दररोज या हत्याप्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. अशातच आता जबाबातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिवंगत संतोष देशमुख यांची गाडी शिवराज देशमुख (Shivraj Deshmukh) हे चालवत होते. अपहरणानंतर देशमुख यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले होते.

यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन महाजन आणि बनसोडे यांना संपूर्ण माहिती दिली होती. पण पोलिसांनी त्यांना तीन ते साडेतीन तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते. कायदा बदललेला असल्याने पुस्तक पाहून कलम लिहावे लागते, असे त्यांना पोलीस म्हणाले होते.

याच कारणामुळे फिर्याद देण्यासाठी खूप वेळ लागला, अशी माहिती शिवराज देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांच्यासोबत जाताना सुधीर सांगळे याने उमरी टोल नाक्यावर गाडी अडवून ड्राईवर साईटच्या काचेवर दगड मारला होता.

यावेळी शिवराज देशमुख यांना मारहाण केली. तसेच त्यांना जयराम चाटे याने कोयत्याने धमकावले. दरम्यान, शिवराज देशमुख यांनी दिलेल्या माहितीवरून पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Shocking information has come to light from the statement given by Shivraj Deshmukh in the Santosh Deshmukh murder case.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now