Manoj Jarange Patil । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याची गॅंग बीड जिल्हा कारागृहात आहे. आज सकाळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेने मारहाण केली.
यावर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया देत वेगळीच शंका उपस्थित केली आहे. “वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाली असल्याची माहिती आहे. पण त्या बाबत आपल्याला काही माहिती नाही,” असे जरांगे पाटील म्हणाले.
“ज्याबद्दल काहीच माहिती नाही, त्याबद्दल अधिकृत भूमिका आपण सांगणे उचित नाही. आज काय झालं की नाही झाले की अफवा उठवली, याबद्दल कल्पना नाही. हे आरोपी सोंग करणारे आहेत,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
Manoj Jarange Patil first Reaction on Walmik Karad and Sudarshan Ghule Attack
“जोपर्यंत अधिकृत माहिती बाहेर येत नाही, तोपर्यंत या प्रकरणावर काही बोलता येणार नाही. जर तुरुंगात गँगवार झाले असेल, प्रक्रिया सुरू असेल तर ते एखाद्या वेळी खरं असेल. त्वरित खटला चालून संतोष देशमुखांना आरोपींना फाशी द्यावी,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या :