Share

जेलमध्ये कराडला मारहाण करणारा Akshay Athawale आहे तरी कोण? धक्कादायक माहिती उघड

by MHD
Who is Akshay Athawale

Akshay Athawale । गित्ते गँगचा सदस्य महादेव गित्ते (Mahadev Gitte) आणि अक्षय आठवलेने बीड जिल्हा कारागृहात आज सकाळी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला मारहाण केली. कराड-घुलेला मारहाण करणारा अक्षय आठवले कोण आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

महादेव गित्तेची मदत घेऊन कराडला मारहाण करत अक्षय आठवलेने जुना वचपा काढला अशी चर्चा सुरू झाली आहे. अक्षय आठवले हा आठवले गँगचा गुंड असून जानेवारी महिन्याच्या शेवटी आठवले गँगच्या गुंडांवर मकोका लावला आहे.

काही महिन्यापूर्वीच या गँगचा प्रमुख असणाऱ्या सनी आठवलेने वाल्मिक कराडने आपल्याला फसवून त्यानंतर त्यातून वाचवले असा आशय असणारी पोस्ट केली होती. अक्षय आठवले हा त्याच सनी आठवलेचा भाऊ आहे.

आठवले गॅंगवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून यात हत्येचा प्रयत्न, अवैध शस्त्र, अवैधरीत्या शस्त्रांची विक्री, दरोडा, जबरी चोरी, हाणामारी, अग्निशस्त्रे चालविणे, पोलिसांच्या कायदेशीर ताब्यातून जीवघेणा हल्ला करून पळून जाणे, सरकारी कामात अडथळा आणणे, खंडणी मागणे यांचा समावेश आहे.

Who is Akshay Athawale? who beaten up Walmik Karad and Sudarshan Ghule in Jail

यापैकी 16 गुन्ह्यांची दखल न्यायालयाकडून घेण्यात आली आहे. सनी आठवले, अक्षय आठवले, प्रसाद धीवार, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, आणि ओंकार सवाई यांच्यावर मकोका दाखल केला होता.

महत्त्वाच्या बातम्या :

There has been talk that Akshay Athawale has taken the help of Mahadev Gitte and beaten up Karad to get rid of his old grudge. Who is Akshay Athawale who beat up Karad-Ghule? This question is being raised.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now