Suresh Dhas । संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड कारागृहात मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती खोटी असल्याचं कारागृह प्रशासनानं म्हटलं होतं. यावर आता आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण केली असा त्यांच्यावर आरोप आहे, मात्र महादेव गित्ते याने हा आरोप फेटाळून लावत आम्हालाच मारहाण करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, बीडच्या जेलमधून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेला हलवण्यात आलं आहे. याबाबत सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला आहे.
Suresh Dhas Statement On Walmik Karad About Santosh Deshmukh Murder Case
“मारहाणीच्या घटनेनंतर जेल प्रशासनाने ही कारवाई केली. वाल्मिक कराड हा काय जेल प्रशासनाचा जावई आहे का?”, असा सवाल आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासोबतच हा मुद्दादेखील अजित पवार यांच्यासमोर मांडला असल्याचं असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :