Share

“काकांना त्यांनी आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय”; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Devendra Fadanvis यांचा टोला

Devendra Fadanvis | अजित पवार शरद पवारांची साथ सोडत महायुतीत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं. तेव्हापासून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज अजित पवारांनी बीडच्या दौऱ्यादरम्यान बोलताना शरद पवारांची आठवण काढल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. Devendra Fadanvis Reaction On Ajit Pawar … Read more

Published On: 

Devendra Fadanvis reaction on ajit pawar statement about sharad pawar

Devendra Fadanvis | अजित पवार शरद पवारांची साथ सोडत महायुतीत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं. तेव्हापासून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज अजित पवारांनी बीडच्या दौऱ्यादरम्यान बोलताना शरद पवारांची आठवण काढल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Devendra Fadanvis Reaction On Ajit Pawar Statement About Sharad Pawar

आई-बापाच्या व चुलत्याच्या कृपेने खूप चांगलं चाललं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त हात जोडा काही आणू नका, असं अजित पवार म्हणालेत. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टोला लगावला आहे.  अजित पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवार बरोबर म्हणाले. मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. काकांना त्यांनी आशीर्वादापुरतंच त्यांनी मर्यादित ठेवले आहे. हे तुम्ही लक्षात घ्या.”

अजित पवार नेमकं काय म्हणालेत?

ते म्हणाले, “हाराचा बोझा आहे मानगुटीवर. काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं. काही देऊ नका. फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार घ्या. पायाही पडू नका.” त्याचबरोबर आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नसल्याचं अजित पवार म्हणालेत. “आईबापाच्या पाया पडा, गुरूच्या पाया पडा. महापुरुषांच्या पाया पडा. पण उगाचच कोणत्याही नेत्याच्या पाया पडू नका. ही लाचारी पत्करल्यासारखं होतं,” असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही