Share

वक्फ विधेयकावरील संजय राऊतांच्या टीकेवर Eknath Shinde म्हणाले, “आम्ही खुलेआम…”

Eknath Shinde Criticized Sanjay Raut over his statement about Waqf Bill

Eknath Shinde । गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध होत आहे. वक्फ बोर्ड विधेयकाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण देखील पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही या विधेयकावरून भाजपाला लक्ष्य केलं जातंय. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर तसेच भाजपावर निशाणा साधला.

वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्त्वाचा काहीही संबंध नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. राऊतांच्या या भूमिकेवर आता उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पलटवार केला आहे.

“आम्ही सोईचं राजकारण कधीही करत नाही. सोईचं राजकारण करणारे लोक वक्फ बोर्डाचा हिंदुत्वाशी संबंध नाही, असं म्हणतात. त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही. आम्ही सडेतोड आणि सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांप्रमाणे आम्ही खुलेआम भूमिका घेतो. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

Sanjay Raut Statement On Waqf Amendment Bill

“या विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही. उगाच महाराष्ट्र व देशाचं वातावरण बिघडवू नका. वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. फडणवीस तसा दावा करत असतील, तर त्यांनी आमची शाळा घ्यावी, आम्ही येऊ. ते जर नवे शंकराचार्य झाले असतील तर त्यांनी आमची शाळा किंवा शिबिरं घ्यावी”, असंही संजय राऊत यांनी म्हंटल.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde । गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध होत आहे. वक्फ बोर्ड विधेयकाची …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics