Share

“…नाहीतर आमची अवस्था बँड वाल्याप्रमाणे  व्हायची”; Sadabhau Khot यांची तुफान फटकेबाजी

Sadabhau Khot made hilarious statement

Sadabhau Khot । जत विधानसभा मतदार संघाचे आमदार झाल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा विटा येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार  सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली.

एक दिवस गोपीचंद पडळकर यांना नक्की मंत्री करतील असा मला विश्वास आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हंटल आहे. पृथ्वीराज देशमुख तुम्ही खासदार व्हा, गोपीचंद मंत्री व्हा. तेव्हा मात्र मला कुठे राज्यपाल तर करा, नाहीतर आमची अवस्था बँड वाल्या प्रमाणेच व्हायची असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी टोलेबाजी करत सभेत हशा पिकवला.

यावेळी बोलताना त्यांनी गोपीचंद पडळकर यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष जर कोणी केला असेल तर ते गोपीचंद पडळकर आहेत, असं ते म्हणाले. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे. कारण योद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा शब्दात त्यांनी पडळकरांचं कौतुक केलं.

महत्वाच्या बातम्या :

Sadabhau Khot । जत विधानसभा मतदार संघाचे आमदार झाल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा विटा येथे भव्य नागरी सत्कार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now