Share

 Gopichand Padalkar | “फडणवीसांनी मला संयम राखायला सांगितलंय, पण…”, पडळकरांनी स्पष्टच सांगितलं 

 Gopichand Padalkar | "फडणवीसांनी मला संयम राखायला सांगितलंय, पण...", पडळकरांनी स्पष्टच सांगितलं 

Gopichand Padalkar | विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर गेल्या आठवड्यात महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन २० दिवस झाले आहेत. मात्र, तरीही महायुतीमधील काही नेत्यांमध्ये अजूनही नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील याबाबत भाष्य करत नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे याचे आम्हाला समाधान आहे. असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपण मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज नसल्याचे म्हटले. आज सांगलीत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटीचा संप चिघळविण्यात मोठा हातभार असणाऱ्या  मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून अजिबात तोंड बारीक करु नका, संघर्षाचे दिवस आता संपले आहेत, आपलं सरकार आलंय आणि आपला लेक मुख्यमंत्री झाला आहे. आता ज्यांना संघर्ष करायचा आहे, त्यांना संघर्ष करू द्या, परंतू विरोधक देखील संघर्ष करण्याच्या स्थितीत राहिलेले नाहीत अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

माझा घेर आता मी बदललेला आहे. आता माझा मोड हा बापू बिरू वाटेगावकरांचा नाही, मी आता बाळूमामाच्या मोडमध्ये गेलो आहे. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संयम राखायला सांगितला आहे. पण माझा संयम हा मंत्रिपदासाठी नाही, असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही, असे स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे. सांगलीत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Nagpur Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now