गोपीचंद पडळकरांचा जितेंद्र आव्हाडांना इशारा, “मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ काढू नका!”

After Vidhan Bhavan scuffle, Gopichand Padalkar warns Jitendra Awhad, stating he knows everything and will speak soon.

Published On: 

Gopichand Padalkar warns Jitendra Awhad after Vidhan Bhavan scuffle.

मुंबई: विधानभवनातील हाणामारीच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला, ज्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. सुरुवातीला संयम बाळगून असलेले गोपीचंद पडळकर यांनी अखेर प्रसारमाध्यमांसमोर येत जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

गुरुवारी, १७ जुलै रोजी, विधानभवनाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आव्हाड यांनी मध्यरात्री पोलिसांच्या गाडीसमोर आडवे पडून आंदोलन केले. आज सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली.

Gopichand Padalkar warns Jitendra Awhad

आव्हाडांच्या टिकेनंतर पडळकरांनीही मौन सोडून आव्हाडांना प्रत्युत्तर दिले. “जितेंद्र आव्हाड यांना सांगावं की, मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तुम्ही काही धुतल्या तांदळाचे नाहीत, मला तुमच्या सगळ्यांबद्दल सर्व काही माहिती आहे,” अशा शब्दांत पडळकरांनी आव्हाडांना सुनावले.

पडळकर पुढे म्हणाले, “सकाळपासून आव्हाडांचं जे नाटक सुरू आहे, त्यावर मी सविस्तर बोलेन. मला न बोलण्याच्या सूचना मिळाल्या आहेत, त्यामुळे मी शांत आहे. पण मी यावर सविस्तर भूमिका मांडेन. तोपर्यंत आव्हाडांनी माझ्या मौनाचा चुकीचा अर्थ काढू नये.” पत्रकारानी ही धमकी आहे का विचारल्यावर, पडळकर म्हणाले, “यात कसली आली आहे धमकी? आता आपले मुद्दे सविस्तर मांडायचे देखील नाहीत का? कोणी चुकीचं बोललं असेल, तर त्याला उत्तर दिलेच पाहिजे.”

या घटनेनंतर पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली होती. “मी अध्यक्षांना विनंती केली होती की, आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली. त्यांना सक्त ताकीद देऊन जी काय कारवाई करायची ती करा, असे मी सांगितले,” असे पडळकर म्हणाले.

या प्रकरणातील एफआयआर (FIR) रात्री उशिरा दाखल झाला असून, कायदा सर्वश्रेष्ठ आहे असे पडळकर यांनी नमूद केले. “विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे सर्वोच्च असतात. त्यांच्या भूमिकेवर आमचं कुठलंही मत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्याचे मान्य करत, “आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही याविरोधात न्यायालयात लढाई देऊ,” असेही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही