🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब ( Anil Parab ) यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर थेट आरोप करत, सभागृहात खळबळ उडवून दिली. कांदिवलीमधील ‘सावली’ नावाचा डान्सबार योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर असल्याचा दावा करत परब यांनी सरकारवर नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला.
परब म्हणाले, “या बारवर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकला. तेव्हा २२ बारबाला, २२ ग्राहक आणि ४ कर्मचारी पकडण्यात आले. ग्राहकांवर गुन्हे दाखल झाले असून, पोलिस पंचनाम्यात या बारचे परवाना ज्योती रामदास कदम यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. ज्योती रामदास कदम म्हणजेच गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री.”
Anil Parab alleges Yogesh Kadam
परब यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर जोर देत कदमांवर हल्ला चढवला. “एकीकडे लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेता, दुसरीकडे मातांसमान आया-बहिणींना डान्सबारमध्ये उभं करता? ही दुहेरी भूमिका कितपत योग्य आहे?” असा बोचरा सवाल त्यांनी केला.
गृहराज्यमंत्री पदावर राहण्याची नैतिकताच उरलेली नाही, असा आरोप करत परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली. “जर कारवाई झाली नाही, तर हे सरकार अशा प्रकारांना पाठीशी घालतंय, असं लोकांमध्ये चित्र निर्माण होईल,” असा इशारा परब यांनी दिला. परब यांनी राज्याच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले, “महाराष्ट्र बिहार बनतोय का? गृहराज्यमंत्रीच कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर जनतेच्या सुरक्षेचं काय?”
विधान परिषदेत बोलताना परब यांनी आणखी एका मुद्द्यावर लक्ष वेधलं. “आमच्या पीएला राज्यपालांच्या कार्यालयात खाली उतरवलं, म्हणे सुरक्षा कारणास्तव. जर राज्यपालच सुरक्षित नाहीत, तर ‘जनसुरक्षा विधेयक’ चाटायला ठेवलंय का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. काल विधिमंडळात झालेल्या गोंधळावरही परब यांनी चिंता व्यक्त केली. “हे सरकार जर इतकं असंवेदनशील असेल, तर लोकशाहीचं भवितव्य धोक्यात येईल,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ३ वर्षांपासून शिव्या ऐकतोय, उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय! – एकनाथ शिंदे
- “आम्ही देव नाही, आरोपी सापडत नाहीत! जास्त बोलाल, तर खोटे गुन्हे दाखल करू!” पोलिसांची पीडितेच्या कुटुंबीयांना धमकी
- किर्तनकार सुनिता आंधळे यांच्या संस्थेत १९ वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











