Share

३ वर्षांपासून शिव्या ऐकतोय, उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय! – एकनाथ शिंदे

Eknath Shinde attacks Uddhav Thackeray, says “Chemical locha”, “abuse for 3 years”.

Published On: 

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. “गेल्या तीन वर्षांपासून माझ्यावर रोज शिव्या-शाप, आरोप सुरू आहेत. उद्धव ठाकरेंचा ‘केमिकल लोचा’ झालाय,” अशा शब्दांत शिंदे ( Eknath Shinde ) यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

शिंदे म्हणाले, “सभागृहात दोन दिवस चर्चा झाली. मी अंबादास दानवेंच्या कार्याचं कौतुक केलं, त्यावरून इतकं तापायला काही कारण नव्हतं. पावसाळ्यात छत्र्या उगवतात की बेडूक, पण इतक्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिलेला नाही.” ‘चल मेरे भाई’ आणि ‘खंजीर’ या शब्दप्रयोगांचा वापर करत शिंदे यांनी शिवसेना-मनसे संभाव्य युतीवरूनही ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना टोला लगावला. “ज्यांना संपलेलं म्हटलं त्यांच्याच सोबत आज रोज जातात. ‘चल मेरे भाई, हात जोडता हूँ’ असं वाटायला लागलंय,” असं ते म्हणाले.

Eknath Shinde attacks Uddhav Thackeray, says “Chemical locha”

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर अन्याय केला, असा आरोप करत शिंदे म्हणाले, “जनतेने शिवसेना-भाजपला कौल दिला होता. पण निकालानंतर देवेंद्रजींनी फोन केले तरी फोन उचलला गेला नाही. फडणवीस यांनी मुंबई महापालिकेचं महापौरपद दिलं, पण परतफेड न करता दगाबाजी केली गेली. मुख्यमंत्रीपदावरून टीका करण्याआधी तुमच्याकडे तीन बोटं येतात. मी सामान्य घरातला मुलगा मुख्यमंत्री झालो, याचा एवढा द्वेष का? इतकी पोटदुखी कशासाठी?”

शिंदेंनी ‘केमिकल लोचा’चा आरोप करताना म्हटले, “एकीकडे आरएसएसला टोमणे मारायचे, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित भाईंना शिव्या द्यायच्या. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना बुके द्यायचा. केमिकल लोचा झालाय बहुदा!” लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतानाही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याबद्दलही शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. “नरेंद्र मोदींबाबत यांच्या मनात किती द्वेष आहे, याचे साक्षीदार उदय सामंत आहेत,” असेही शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले.

“मी कुणालाही उद्देशून सोन्याचा चमचा म्हणालो नव्हतो. आम्ही एक भाकर चार जण वाटून खाणारे. सत्ता आणि खुर्चीसाठी आम्ही तडजोड करत नाही. गुवाहाटीला असताना दुसरीकडे दिल्लीशी संपर्क करून ‘यांना घेऊ नका, आम्ही येतो’ अशी चर्चा सुरू होती. मी स्वतःहून कुणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर मी नुसता पाहत बसत नाही,” असे म्हणत शिंदे यांनी आपल्या निर्णयांमागचं राजकारण उघडपणे मांडलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या