🕒 1 min read
अहिल्यानगर, (राजेभाऊ मोगल): महाराष्ट्राला पुन्हा एकदा मान खाली घालायला लावणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून, देवाची आळंदी येथील प्रसिद्ध कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे यांच्या ‘श्री. भगवानबाबा वारकरी संस्थे’त तिच्यावर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकरणात कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल झाले असले, तरी याहून धक्कादायक बाब म्हणजे, पीडित कुटुंबीयांना चक्क पोलिसांकडूनच ( PSI Vishal Lahane ) “आम्ही देव नाहीत, आरोपी आम्हाला सापडत नाहीत,” असं उद्धट उत्तर मिळालं, इतकंच नाही तर “जास्त बोलाल तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू,” अशी थेट धमकीही देण्यात आली आहे. या गंभीर प्रकाराने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२ जून रोजी सायंकाळी शेवगाव तालुक्यात १९ वर्षीय मुलीचे अपहरण करून देवाची आळंदी येथे किर्तनकार सुनिता आंधळे यांच्या ‘भगवानबाबा वारकरी संस्थे’त नेण्यात आले. तिथे अण्णासाहेब आंधळेने लग्नासाठी जबरदस्ती केली आणि नकार दिल्यावर, सुनीता व प्रवीण आंधळेच्या मदतीने तिला खोलीत डांबून बलात्कार केला.
पीडित मुलीने मोबाईलवरून ११२ वर कॉल करताच सकाळी आळंदी पोलिसांनी तिला बाहेर काढले. कुटुंबीयांनी नंतर तिचं लग्न जुळवलं होतं, पण अण्णासाहेबने धमकी देत फोटो पाठवल्याने लग्न मोडलं. या प्रकारानंतर पोलिसांकडे तक्रार करताच चौकशी टाळण्यात आली होती. अखेर ८ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला.
PSI Vishal Lahane rude reply “we are not gods” to victim’s family
पूर्ण घटनाक्रम- लिंक वर क्लिक करा
आरोपींना अद्याप अटक का नाही, असे विचारले असता, पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने ( Vishal Lahane ) यांनी अत्यंत उद्धटपणे उत्तर दिल्याचे वडिलांनी सांगितले. लहाने म्हणाले, “आम्ही देव नाहीत, आरोपी आम्हाला सापडत नाहीत, तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन जा.” एवढेच नाही तर, “जास्त बोलाल तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू,” अशी थेट धमकीही लहाने यांनी पीडित वडिलांना दिल्याचा धक्कादायक आरोप आहे.
या प्रकरणी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहनचालक, कीर्तनकार सुनीता आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे यांच्याविरोधात शेवगाव (जि. अहिल्यानगर) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या बेजबाबदार आणि धमकावण्याच्या भूमिकेमुळे आता पीडित कुटुंबीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गृह विभागाकडे दाद मागणार आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- किर्तनकार सुनिता आंधळे यांच्या संस्थेत १९ वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- डिजिटल युगातील व्यवसायाची गुरुकिल्ली: डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे?
- नवीन भाषा कशी शिकाल? प्रवासाच्या सुरुवातीपासून प्रगतीपर्यंतचे सोपे आणि प्रभावी टप्पे!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












