शिंदेंसाठी भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम शिवसेनेत एकटे पडले? राजकीय वर्तुळात चर्चा

जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरून रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. मात्र, या वादानंतर कदम शिवसेनेत एकाकी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Published On: 

Ramdas Kadam speaking at a press conference regarding BJP and Eknath Shinde

प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपने महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण केला आहे. या क्लिपच्या आधारे ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खळबळजनक दावा केला आहे. भाजपकडून घेतलेले ५०० कोटी रुपये शिंदेंनी जरांगे यांना दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आक्रमक होत शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट जरांगे पाटील आणि मित्रपक्ष भाजपला लक्ष्य केले. ‘भाजपमधून एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा कोणी उचलला आहे,’ असा थेट सवाल कदम यांनी विचारला.

कदम यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि नवनाथ बन यांच्यासह अनेक नेत्यांनी रामदास कदम यांच्यावर चहुबाजूंनी जोरदार पलटवार केला. मात्र, या शाब्दिक चकमकीत मंत्री उदय सामंत यांचा अपवाद वगळता शिवसेनेतील अन्य कोणत्याही नेत्याने भाजपला प्रत्युत्तर दिले नाही. परिणामी, शिंदेंसाठी संपूर्ण भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम पक्षात एकाकी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मित्रपक्षाकडून रचल्या जात असलेल्या कथित कटाबाबत रामदास कदम यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संबंधित ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी केली. क्लिपप्रकरणी चौकशीची मागणी होत असली तरी, कदम यांच्यावरील भाजपच्या टीकेवर शिवसेनेतील नेत्यांनी मौन बाळगले आहे.

भाजपला थेट आव्हान देणारे कदम पक्षात एकाकी पडल्याचे चित्र असून, शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस वाढल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. आता एकटे पडलेल्या रामदास कदम यांच्यासाठी शिंदे गट कोणती भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

भाजपकडून घेतलेले ५०० कोटी रुपये एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे यांना दिले नाहीत, असा आरोप किशोरी पेडणेकर आणि विरोधकांनी केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही