Share

महादेव मुंडे हत्या प्रकरण: बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबला; फडणवीस म्हणतात….!

After 16 months of no arrests in Mahadev Munde murder case, victim’s wife attempts suicide in protest

Published On: 

Mahadev Munde murder case investigation officer changed

🕒 1 min read

बीड/मुंबई : परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास १६ महिन्यांनंतरही न झाल्याने अखेर कुटुंबीयांचा संयम सुटला. न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणावर आज सभागृहात गंभीर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाच्या तपशीलांची माहिती दिली असली, तरी पोलिसांच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

ऑक्टोबर 2023 मध्ये व्यापारी महादेव मुंडे यांची परळीत दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. कुटुंबीयांनी या हत्येमागे वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र इतक्या कालावधीनंतरही कोणतीही अटक झाली नसल्याने आरोपी मोकाट फिरत असल्याचे चित्र आहे.

Mahadev Munde Murder Case

न्याय मिळत नसल्यामुळे तणावात असलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. “बंगल्यावरून फोन आला, आणि तपास थांबवण्यात आला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. “माझी मुलं बाबांना का मारलं असं विचारत आहेत. एक महिन्यात न्याय न मिळाल्यास मी स्वतःला संपवेन,” असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणात ( Mahadev Munde Murder case ) आतापर्यंत १९६ जणांची चौकशी, ८३ साक्षीदारांची तपासणी आणि २८६ जणांचे मोबाईल डेटा विश्लेषण करण्यात आले आहे. खुल्या मैदानात हल्ला झाल्यामुळे साक्षीदार मिळवण्यात अडचण येतेय. ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आक्रोश समजतो. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही.”

मुख्यमंत्र्यांच्या ( Devendra Fadnavis ) माहितीनंतरही या प्रकरणातील गुंतागुंत आणि तपासाची गती याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी लावलेल्या आरोपामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही आता बोट ठेवले जात आहे. न्याय मिळवण्यासाठी एका महिलेला आत्महत्येचा प्रयत्न करावा लागतो, हे शासनाच्या कारभारावर थेट प्रश्न उपस्थित करणारे आहे. आरोपींना कधी बेड्या ठोकल्या जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!