Devendra Fadanvis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं. “पुढील पाच वर्षात आम्ही लोकांना घरे देणार आहोत. सर्व योजनांतून जी घरे होतील, त्या लोकांना सोलर देणार आहे. घरात राहायला जाणाऱ्यांना मोफत वीज मिळेल. त्यांना बिलच येणार नाही. हा आमचा प्रयत्न आहे”, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.
“मला जी काही संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करेल. नागपूरकर म्हणून नागपूरची मान उंच राहिली पाहिजे. आपला प्रतिनिधी काम करत असताना महाराष्ट्रात बदल घडतोय अशी उंची महाराष्ट्राला देणार आहे. पारदर्शी कारभार करणार आहे,” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
तसेच, दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याबाबत व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचा उल्लेख करत त्यांनी काही किस्से देखील सांगितले. “२०१४ साली जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या. काहींना वाटायचं की हा मंत्रीही राहिलेला नाही, मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल? काहींना असं वाटायचं की अतिशय नवीन असं काम याच्याकडे आलंय. त्यामुळे याची कामगिरी कशी होईल? पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय होईल का?”, अशा शंका लोकांच्या मनात असल्याचं फडणवीसांनी यावेळी म्हंटल.
पुढे ते म्हणाले, “लोकांच्या लक्षात आलं की विदर्भासाठी आपण मोठं काम केलंच. पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर आपण अन्याय होऊ दिला नाही.” यावेळी वाढत्या सायबर गुन्हेगारीबद्दल सुद्धा ते बोलले. “आता सर्व माहिती व्हॉट्सअपला मागता येते. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की, नुसता गुन्हा करणारा गुन्हेगार नाही, तर अशा गोष्टी फॉरवर्ड केल्याने आपण सहगुन्हेगार होतो,” असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | यशवंतराव चव्हाण, फुले, शाहू आंबेडकरांचे फोटो लावणं अजितदादांनी बंद करायला पाहिजे- संजय राऊत
- Deepak Kesarkar | “उदय सामंत एवढे हुशार आहेत, की…”, रिफायनरी प्रकल्पावरून दीपक केसरकर यांचा खोचक टोला
- Sanjay Raut | “बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू आहे”, लाडक्या बहीण योजनेवरून संजय राऊतांची सडकून टीका