🕒 1 min read
मुकेश अंबानी यांचं कुटुंब नेहमीच चर्चेत राहतं, मग ते उद्योग, सामाजिक कार्यक्रम असो किंवा खासगी आयुष्यातील घडामोडी. अलीकडेच अंबानी कुटुंबात दुःखद घटना घडली असून, त्यांच्या अत्यंत लाडक्या पाळीव कुत्रा ‘हॅपी’चा मृत्यू झाल्याचं समजतंय. सोशल मीडियावर हॅपीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनेक भावनिक पोस्ट्स व्हायरल होत आहेत.
‘हॅपी’ हा गोल्डन रिट्रीव्हर जातीचा होता आणि अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या खूप जवळचा होता. वयामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ambani family beloved dog ‘Happy’ passes away; Emotional posts on social media
अनेक समारंभांमध्ये, विशेषतः अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुडा व लग्नसोहळ्यात, ‘हॅपी’ची उपस्थिती अनेकदा पाहायला मिळाली होती. त्याच्यासाठी खास ड्रेस डिझाइन केला गेला होता आणि तोही समारंभात तितकाच महत्त्वाचा होता.
त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर प्राणीप्रेमींनी दुःख व्यक्त केलं असून, अनेकांनी ‘हॅपी’च्या आत्म्यास शांती लाभो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- संजय दत्तच्या ‘द भूतनी’ चित्रपटात हॉररपेक्षा कॉमेडी अधिक, काय आहे चित्रपटाची कथा?
- उन्हाळ्यात डोक्यातील खाजेपासून सुटका हवीय? वापरा ही 6 हिरवी पाने, लगेच मिळेल आराम
- युझवेंद्र चहलची ऐतिहासिक हॅटट्रिक; चेन्नईविरुद्ध एका ओव्हरमध्ये चार बळी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now