Share

बेस्टच्या भाडेवाढीला मुंबईच्या डबेवाल्यांचा तीव्र विरोध; कारभार सुधारा, भाडे वाढवू नका!

Mumbai Dabbawala Association opposes BEST bus fare hike; urges management reforms instead of burdening common commuters.

Published On: 

Mumbai Dabbawala Association Opposes BEST Fare Hike, Suggests Management Reforms

🕒 1 min read

मुंबई : मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या लोकल आणि बेस्ट बससेवेवर महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला असून, प्रवाशांवर आर्थिक भार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या निर्णयाला मुंबई डबेवाला असोशिएशनने जोरदार विरोध केला आहे.

मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले की, बेस्टच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणा, आर्थिक बेशिस्त आणि नव्या उपक्रमांचा अभाव यामुळे बेस्टची आर्थिक स्थिती ढासळली आहे. यावर उपाय म्हणून तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय प्रवाशांच्या विरोधात असून, तो अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai Dabbawala Association Opposes BEST Fare Hike

सुभाष तळेकर यांनी सुचवले की, बेस्टच्या मोक्याच्या जागांचा व्यापारी वापर करून उत्पन्न वाढवता येऊ शकते. कुलाबा ते दहिसर आणि मुलुंडपर्यंत असलेल्या बेस्टच्या मालकीच्या जागांचे योग्य नियोजन केल्यास बेस्टला आर्थिक मदत मिळू शकते. तसेच, आवश्यक मार्ग पुन्हा सुरू करणे, बस ताफा वाढवणे आणि आर्थिक शिस्त पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

बेस्टच्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त करत मुंबई डबेवाला असोशिएशनने भाडेवाढ थांबवून व्यवस्थापन सुधारण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!