Share

डिंपल कपाडिया यांचं धक्कादायक वक्तव्य; नाना पाटेकरांना म्हटलं ‘घृणास्पद आणि नकारात्मक’!

Dimple Kapadia created a stir by calling Nana Patekar “disgusting and negative” during an interview, despite acknowledging his immense talent and their strong friendship.

Published On: 

Dimple Kapadia created a stir by calling Nana Patekar “disgusting and negative” during an interview, despite acknowledging his immense talent and their strong friendship.

🕒 1 min read

मुंबई | बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांची एकेकाळी घनिष्ट मैत्री होती. त्यांनी ‘प्रहार’, ‘अंगार’ आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ‘तुम मिलो तो सही’ या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आल्यावर डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने सर्वत्र खळबळ उडवली होती.

‘एनडीटीव्ही’च्या मुलाखतीत डिंपल कपाडिया यांना नानांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आलं होतं. या प्रश्नाला उत्तर देताना डिंपल म्हणाल्या की, “मला नाना घृणास्पद आणि नकोसे वाटतात.” त्यांनी पुढे सांगितलं की, नाना पाटेकर अतिशय प्रतिभावान आहेत आणि त्यांच्या अभिनयासाठी आपण सर्व चुका माफ करू शकतो.

Dimple Kapadia Calls Nana Patekar ‘Disgusting and Negative’

तरीदेखील, डिंपलने स्पष्टपणे सांगितले की, “व्यक्ती म्हणून नाना माझ्याशी चांगले वागतात, आम्ही चांगले मित्र आहोत, पण मी त्यांच्या भयंकर नकारात्मक बाजूचं दर्शन देखील घेतलं आहे.” प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक अशी बाजू असते जी तो इतरांपासून लपवतो, आणि नानांनी ती बाजू चांगल्या प्रकारे लपवली असल्याचं डिंपलने नमूद केलं. डिंपल कपाडिया यांच्या या थेट आणि बेधडक वक्तव्याची बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Entertainment India Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या