Share

विकी कौशलच्या घराचे एका महिन्याचे भाडे किती? किंमत ऐकून धक्का बसेल

Vicky Kaushal pays a whopping ₹17 lakh monthly rent for his luxurious Juhu apartment, totaling nearly ₹6.2 crore over three years.

Published On: 

How much is the monthly rent of Vicky Kaushal's house? You will be shocked to hear the price

🕒 1 min read

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) जुहूमधील आपल्या आलिशान अपार्टमेंटची लीज पुन्हा नूतनीकरण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी यासाठी दर महिन्याला तब्बल ₹17.1 लाख रुपये घरभाडे भरणार आहे. पुढील तीन वर्षांच्या कालावधीत तो सुमारे ₹6.2 कोटी रुपयांचे भाडे भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता विकी कौशलच्या जुहूमधील या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 258.84 चौरस फूट असून त्यात तीन कार पार्किंगची सुविधा आहे. विकी कौशल गेल्या पाच वर्षांपासून या घरात राहत आहे. त्यावेळी त्याचे भाडे ₹8 लाख दरमहा होते. एप्रिल 2025 मध्ये या लीजची पुन्हा नोंदणी करण्यात आली आहे.

How much is the monthly rent of Vicky Kaushal’s house? You will be shocked to hear the price

करारानुसार, विकीने ₹1.69 लाख स्टॅम्प ड्युटी, ₹1000 नोंदणी शुल्क आणि ₹1.75 कोटींचा सिक्युरिटी डिपॉझिट भरला आहे. दुसऱ्या वर्षीही त्याच घराचे भाडे ₹17.01 लाख राहणार असून तिसऱ्या वर्षी ते वाढून ₹17.86 लाख होईल.

जुहू हा मुंबईतील एक प्रमुख आणि लोकप्रिय परिसर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची या ठिकाणी घरे आहेत. शाहरुख खान, सलमान खान, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह विकी कौशलही या यादीत सामील झाला आहे.

विकी कौशलच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्याने ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’, ‘मसान’, ‘राजी’, ‘संजू’ आणि ‘सरदार उधम’ सारख्या चित्रपटांतून स्वतःचे स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले आहे. त्याचा नुकताच आलेला चित्रपट ‘छवा’ हिट ठरला. लवकरच तो रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत ‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या