Chhaava । बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) स्टारर छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील छावा चित्रपटाने नवीन विक्रम रचले आहेत. अजूनही या चित्रपटाची क्रेझ कमी झाली नाही. कमाईचा (Chhaava Collection) विचार केला तर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180.25 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी रुपये, चौथ्या आठवड्यात 55.95 कोटी रुपये कमावले.
अशातच आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 36 व्या दिवशीच्या कलेक्शनचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने 36 व्या दिवशी 2.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासह, छावाची एकूण 36 दिवसांची कमाई आता 574.95 कोटी झाली आहे.
छावा हा चित्रपट दररोज रेकॉर्ड मोडत आहे. सध्या जरी या चित्रपटाची कमाईही घटली असली तरी देशातील सर्वात जास्त कमाई करणार्या पुष्पा 2 ला या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. स्त्री 2 या चित्रपटालाही छावा ने मागे टाकले आहे.
Chhaava broke Pushpa 2, Uri The Surgical Strike and Stree 2 film record
पुष्पा 2 ने 36 व्या दिवशी 1.5 कोटी रुपये कमावले होते. तसेच उरी द सर्जिकल स्ट्राइकने 36 व्या दिवशी 1.2 कोटी रुपये कमावले होते. अशातच आता आणखी किती दिवस बॉक्स ऑफिसवर छावाची क्रेझ कायम राहते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :