Share

आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? : Chitra Wagh कडाडल्या

by MHD
Chitra Wagh angry on Sushma Andhare

Chitra Wagh । सभागृहात भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.

यावरून आता चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “कोणाच्या मुलाबाळावर बोलणे मलाच आवडत नाही. पण जर तुम्ही दहा वेळेस आमच्या कॅरेक्टरवर बोलत असाल तर त्याचं उत्तर आम्ही देणार,” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी अंधारेंवर निशाणा साधला.

“मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. पण ज्या प्रकारे माझ्यावर टीका केली जात आहे, तुम्ही किती वेळा माझ्या कॅरेक्टरवर बोलणार? या अगोदरचे बोलून थकले आता हे नवीन आले आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, “कुणाच्या लेकरावर बोलायला मला त्रास होतो. पण आम्ही काय रस्त्यावर पडलो आहे का? तुम्ही जेव्हा उठणार तेव्हा आमच्या कॅरेक्टवर बोलणार. मी माझी भूमिका मांडली, त्यात या बाईचे काय होत का?,” असा सवाल वाघ यांनी केला. तसेच त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर देखील एक पोस्ट केली आहे.

Chitra Wagh post on X

चित्रा वाघ X वर लिहितात,”फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागत स्त्री काय आहे. फार हलक्यात घेतात महिलांना, काहीही आम्ही बोलू शकतो ही त्यांची मानसिकता आज ठेचली आणि नादी लागलात आमच्या तर रोजचं ठेचणार. पण काही सटरफटर वटवाघूळ फडफडायचे सोडत नाही असो स्वभाव एकेकाचा,” असा टोला वाघ यांनी लगावला आहे.

“कुणाच्या लेकराबाळांवर मला बोलतांना त्रास होतोय पण आमच्याबद्दल बोलतांना मात्र सगळचं ताळतंत्र सोडलेलं आहे, म्हणून एकच प्रश्न जिचा नवरा सतत पत्रकार परीषद घेवून लेकराची DNA चाचणी करा म्हणतोय DNA चाचणीची मागणी करतोय. काय बोलायचं या कार्यकतृत्वाच्या आलेखाला. त.टी – किव वाटते प्रगाढ पोपट पंडीता ची स्वत:त हिंमत नाही म्हणून असल्या सटराफटरांना पुढे करावं लागतयं,” असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

Chitra Wagh on Sushma Andhare

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवरून त्यांचा चित्रा वाघ यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे आमने सामने आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Chitra Wagh has taken a very harsh view of Sushma Andhare’s criticism.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now