Share

Pune Rape Case पीडित तरुणीच्या ओरडण्याचा आवाज बसबाहेर का आला नाही? महत्त्वाची माहिती समोर

by MHD
In Pune Rape Case police found new evidence against Dattatray Gade

Pune Rape Case । पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकातील बलात्कार प्रकरणामुळे (Swargate rape case) संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला त्याच्याच गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

सध्या तो कोठडीत आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. शिवशाही बसमधून पीडित तरुणीने आरडाओरडा का केला नाही? इतर प्रवाशांना तिचा आवाज कसा ऐकू आला नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता. याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

पुणे पोलिसांकडून तज्ज्ञांच्या उपस्थितीत बसमधील आवाजाची चाचणी करण्यात आली आहे. शिवशाही बस वातानुकूलित असल्याने काचा बंद होत्या. त्यामुळे पीडित तरुणीचा आवाज बाहेर ऐकू आला नाही अशी धक्कादायक माहिती चाचणीत समोर आली आहे.

दरम्यान, तपासाच्या दृष्टीने ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. पोलीस आता दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध मजबूत पुरावे सादर करताना या निष्कर्षाचा वापर करू शकतात. पोलिसांनी या घटनेनंतर तपासाची दिशा वैज्ञानिक आधारावर नेली आहे.

Pune Rape Case police found new evidence

पोलीस प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करत आहे. पोलिसांना आता तपासादरम्यान दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध आणखी कोणते पुरावे मिळतात? आणि पीडित तरुणीला कधी न्याय मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

In the Pune Rape Case the question was being raised as to why the victim girl did not scream from the bus. Important information has come to light in this regard.

Crime Maharashtra Marathi News Pune