Jayakumar Gore । ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने आक्षेपार्ह फोटो (Jayakumar Gore Offensive Photo) पाठवण्यात आल्याचा आरोप केला होता. यावरून विरोधकांनी गोरे यांच्यासह सरकारवर चांगलाच निशाणा साधला होता. यामुळे गोरेंच्या अडचणीत मोठी भर पडली होती.
अशातच आता जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. खंडणी प्रकरणात सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून (Satara Local Crime Branch) ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या या महिलेकडून प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापैकी 1 कोटी खंडणीची रक्कमेचा स्वीकार करताना तिला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, जयकुमार गोरे यांची या प्रकरणात 2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. इतकेच नाही तर जे रेकॉर्ड होते ते देखील हटवण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती गोरे यांच्या कार्यालयाकडून दिली आहे.
Satara police arrest woman who accused Jayakumar Gore
पण गोरे यांनी याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा दिला असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी गोरे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. अशातच आता आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. यावर आता गोरे काय प्रतिक्रिया देतात? याकडे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :