Share

जयकुमार गोरे प्रकरणी Devendra Fadnavis यांचे गंभीर आरोप, म्हणाले; “सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे…”

Devendra Fadnavis has now made serious allegations against Supriya Sule and Rohit Pawar of the Sharad Pawar group in the Jayakumar Gore case.

by MHD

Published On: 

Devendra Fadnavis shocking reveling in Jaykumar Gore case

Devendra Fadnavis । ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांचे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उकरून काढले आहे. याप्रकरणी त्यांनी शरद पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

“जयकुमार गोरेंबाबत घडलेली घटना महत्त्वाची असून एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे राजकारण बरोबर नाही. 2017 साली ते आमच्यासोबत नव्हते. दोषी आहेत की नाही, यापेक्षा समाजात अपमान नको म्हणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न असतो,” असे फडणवीस म्हणाले.

“हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता. उगीचच त्याला हवा देऊ नका. अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करणे चुकीचे आहे, त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. तिच्यावर काय परिणाम झाला असेल याचा विचार करावा,” असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला.

“आरोपीने जो कट रचला होता, आता त्यांचे पुरावे सापडले आहेत. याप्रकरणी सगळे लोक शरद पवार गटाचे लोक असून यामध्ये प्रभाकरराव देशमुख, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांचे कॉल्स सापडले आहेत,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis target Supriya Sule and Rohit Pawar

“या सर्वांनी अटकेत असलेला पत्रकार तुषार खरात यांना फोन केला आणि त्याने व्हिडिओ करून यांना पाठविले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आता या सर्वांची चौकशी होणार आहे,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही