Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही.
त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता याप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी आज बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात (Dr. Ashok Thorat) यांना निलंबित केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
“बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन अशोक थोरात आणि त्यांच्या कामकाजाबद्दल गंभीर आक्षेप असून याप्रकरणी तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण केली जाईल. यामध्ये आढळणाऱ्या दोषींवर कारवाई केली जाईल,” असे प्रकाश आबिटकर म्हणाले.
डॉ. अशोक थोरात यांनी कोरोना काळात भ्रष्टाचार केला असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली होती. त्यांनंतर डॉ. अशोक थोरात यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Beed District Surgeon Ashok Thorat suspended
पण डॉ. अशोक थोरात यांचा संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. संतोष देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल डॉ. अशोक थोरात आणि तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमकडून देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :