Yogesh Kadam । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला जवळपास तिने महिने झाले तरीही देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला दिसत नाही. या प्रकरणात काही पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे.
Yogesh Kadam met Santosh Deshmukh’s family
या भेटीनंतर ‘आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना सोडायचं नाही’, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. वाल्मिक कराड गँगला देखील दुसऱ्या कारागृहात हलविण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून सांगणार असल्याचं योगेश कदम म्हणालेत.
त्याचबरोबर ही घटना जेव्हा घडली तेव्हा कर्तव्यावर असलेले सर्व अंमलदार, हवालदार यांची बदली करण्याची मागणी देखील योगेश कदम यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांनी मला इथे पाठविले आहे. आरोपींना फाशी झाली पाहिजे या विचाराचा मी आहे. अशी क्रूरता मी खपवून घेणारा नाही. योग्य न्याय होईल.”
महत्वाच्या बातम्या :