Shahaji Bapu । सांगोला येथे काल (3 एप्रिल) रात्री सोलापूर चे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नागरी सत्कार ठेवला होता. यावेळी बोलताना शहाजीबापूंनी तुफानी फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी स्वतःच्याच तोंडात मारून घेतली. भर सभेत स्वत:च्या तोंडात चापट मारून घेतल्याचा त्यांचा हा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
Shahaji Bapu slapped himself
“ज्यांनी आजवर सांगोल्याचे पाणी आडवायचे काम केले त्याला तुम्ही खासदार म्हणून पाठवले आणि ज्यांनी सगळ्यात जास्त पाण्याची कामे केली त्याला घरी बसवले. आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे, आपण या चुकीबद्दल तोंडात मारून घ्यायला पाहिजे”, असे सांगत भर सभेत शहाजीबापू पाटील (Shahaji bapu Patil) यांनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलीय.
त्याचबरोबर “आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. जनतेच्या विकासाची कामे करायची असतील तर सत्तेच्या जवळ असलं पाहिजे”, असंही मत शहाजीबापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. दरम्यान, यावेळी शेकापचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख,ठाकरे गटाकडून निवडणूक लढविलेले माजी आमदार दीपक आबा साळुंखे, शेकाप नेते बाळासाहेब एरंडे आणि तालुक्यातील बहुतांश विविध पक्षांचे नेते या सोहळ्यासाठी स्टेजवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :