Sanjay Raut । वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. यावर विरोधकांकडून टीका होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
Sanjay Raut Criticized Praful Patel
“प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत होते. मग दाऊदची दलाली केली असे वाटते. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय, माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन”, अशा तीव्र शब्दात संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांना फटकारलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “त्यांचा इतिहास काढायला लागलो सर्व तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल. ही लोकं फडणवीस यांच्या बाजूला जाऊन बसणार. काय लेव्हल आहे का यांची फडणवीस यांच्या बाजूला बसायची. हे वाकलेले लोकं आहेत. यांना पाठिचा कणा नाही. हे लोक महाराष्ट्राचं नेतृत्व संसदेत करतात. अशा लोकांनी संसदेत उभे राहून बोलण्याची लायकी तरी आहे का?”
महत्वाच्या बातम्या :