🕒 1 min read
Jitendra Awhad । वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. यावर विरोधकांकडून टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. देवस्थानच्या जमिनीची लूटमार सुरू असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.
Jitendra Awhad On Waqf Amendment Bill
“वक्फच्या जमिनी श्रीमंत मुसलमानांनी आपल्या समाजाच्या हितासाठी, धर्मकार्यासाठी दिल्या आहेत. ताजमहल वक्फची जमीन आहे. ती जमीन विकता येणार नाही. हे मी मंत्री असताना फायलीवर लिहून ठेवले होते. या प्रकरणावर मी काम केले आहे, त्यामुळे मला सर्व माहीत आहे”, असे आव्हाड यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, ” आपल्याकडे काही सातबारे हे रामाच्या नावाने आहेत. काही सातबारे विठ्ठलाच्या नावावर आहेत. काही पांडुरंगाच्या नावावर आहेत. या देवस्थानाच्या जमीन आहेत. त्याची विल्हेवाट लावता येत नाही. परंतु महाराष्ट्रात देवस्थानच्या जमिनी खाल्ल्याचे देखील प्रकार आहेत. ते कोणी खाल्ले हेही सर्वांना माहिती आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- “करे तो करे क्या अशी ठाकरेंची अवस्था…”; Chandrashekhar Bawankule यांची बोचरी टीका
- “गद्दार कोण अन् खुद्दार कोण याचा फैसला…”; Eknath Shinde यांचं ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर
- “…तेव्हा एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं”; Deepak Kesarkar यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now