Share

“गद्दार कोण अन् खुद्दार कोण याचा फैसला…”; Eknath Shinde यांचं ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर 

Eknath Shinde criticized Uddhav Thackeray over waqf amendment bill

Eknath Shinde । लोकसभेत रात्री उशिरा वक्फ बोर्ड विधेयक संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केलं. त्यावरून भाजपासह त्यांचे मित्रपक्ष हे उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर निशाणा साधत असतानाच आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपासह एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जहरी टीका केली. त्यांच्या टीकांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray Over Waqf Amendment Bill

उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये विचारधारा सोडून अपराध केला होता. मात्र, त्यापेक्षा मोठा अपराध त्यांनी काल लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन केला, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांचा उल्लेख एसंशि असा केला होता. यावर “मला एसंशि म्हणाले मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

“तुम्ही मला गद्दार म्हणून हिणवलं. खोके-खोके म्हणून टीका केली. मात्र महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हालाच खोक्यात बंद केलं. त्यांनी 100 जागा लढवल्या आणि 20 जागा जिंकल्या. आम्ही 80 जागा लढवल्या आणि आमचा 60 जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रातील जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला गेल्या विधानसभा निवडणुकीत केला आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde । लोकसभेत रात्री उशिरा वक्फ बोर्ड विधेयक संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now