Share

“मी देवेंद्र फडणवीसांना विचारतो की…”; Uddhav Thackeray यांचा खोचक सवाल 

🕒 1 min readUddhav Thackeray । वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनात 288 मतं पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. यावर विरोधकांकडून टीका होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक सवाल केला आहे. Uddhav Thackeray … Read more

Published On: 

Uddhav Thackeray criticized devendra fadanvis ( Devendra Fadnavis ) over waqf amendment bill

🕒 1 min read

Uddhav Thackeray । वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनात 288 मतं पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. यावर विरोधकांकडून टीका होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक सवाल केला आहे.

Uddhav Thackeray Criticized Devendra Fadanvis

“तुम्ही अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांवर चालणार, नवाज शरीफांच्या की जिनांच्या?”, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केलेत. बाळासाहेब ठाकरेंनी इस्तेमासाठी मु्स्लिम बांधवांना जागा दिली होती. ती तुमच्या सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला दिली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्हाला शिकवू नका. तुम्ही तेव्हा बच्चे होतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

फटक्याची वात लावायची आणि पळून जायचं हे भाजपाचं धोरण आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. फटाका फुटल्यावर मिरवत यायचं की आम्हीच वात लावली. पण वाट लावली त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवालही ठाकरेंनी केलाय. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या जहरी टीकांना देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या