Share

“Pankaja Munde लोकनेत्याच्या भूमिकेत नाही तर जातनेत्याच्या…”; पँथर सेनेच्या अध्यक्षांचा हल्लाबोल

Deepak Kedar criticized Pankaja Munde over santosh deshmukh murder case

Pankaja Munde । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते. तर पंकजा मुंडे यांचे बूथ प्रमुख होते. या प्रकरणाला जातीय वळण मिळालेलं दिसलं. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘माझ्या जातील बदनाम करू नका’ असं म्हंटल होतं. त्यांच्या या विधानावर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार (Deepak Kedar) यांनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला आहे.

“पंकजाताई म्हणतात माझ्या जातीला बदनाम करू नका. माझी जात म्हणणं हाच जातीवाद आहे. तुमची जातीवादी भूमिका बरोबर नाही”, अशा शब्दात दीपक केदार यांनी पंकजा मुंडेंच्या विधानावर आगपाखड केली. “आजही लोकनेत्याच्या भूमिकेत तुम्ही नाही. दहा बारा लोकांनी कट करून संतोष देशमुख यांना मारलं आणि तुम्ही याला चार पोरं म्हणता? संतोष देशमुख यांनी पाणी मागितलं तर त्यांना काय पाजलं हे तुम्हाला दिसलं नाही का?, असे सवाल दीपक केदार यांनी केलेत.

Deepak Kedar On Pankaja Munde

आरोपींना पोरं म्हणून पंकजा मुंडे त्यांना क्लिनचीट देत आहेत. त्यांचं विधान अतिशय निंदनीय असल्याचं सांगत त्यांनी माफी मागितली पाहिजे असंही दीपक केदार यांनी म्हंटल आहे. कधीतरी १५०० पानांची चार्जशीट मागवून संतोष देशमुख यांच्यासोबत काय केलं? याची माहिती घ्या असं सांगत केदार यांनी पंकजा मुंडेंना सुनावलं आहे. “तुम्ही लोकनेत्याच्या भूमिकेत नाही तर जातनेत्याच्या भूमिकेत आहेत हे निंदनीय नाही तर दुर्दैवी आहे”, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Pankaja Munde । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics