🕒 1 min read
पुणे | प्रतिनिधी- राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे सध्या राजकारणापासून लांब राहून स्वतःच्या प्रकृती आणि मानसिक शांतीवर लक्ष केंद्रित करत आहेत. इगतपुरीच्या प्रसिद्ध विपश्यना केंद्रात मुंडे ध्यानधारणा करत असून, हा दहा दिवसांचा कार्यक्रम आहे.
धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा दुर्मिळ आजार झाला होता, त्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली. त्याच काळात मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येप्रकरणात त्यांच्या जवळच्या वाल्मीक कराचे नाव समोर आलं आणि विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
Karuna Munde says Dhananjay Munde lose MLA post Soon
या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देत एक खोचक टोला लगावला आहे. “ध्यान धारणेचा मार्ग चांगला आहे. पण आता सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं मंत्रिपद गेलंय आणि आमदारकीही जाणार आहे. राष्ट्रवादीतून गुंडांना बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अजितदादा लवकरच त्यांची हकालपट्टी करतील,” असं करुणा मुंडेंनी म्हटलं आहे.
तसेच, मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंनी योग्य निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. यावर करुणा करुणा मुंडेंनी म्हटलं, “पंकजा मुंडेंना आता मंत्रिपद मिळालंय, त्यांना धनंजय मुंडेंची गरज राहिलेली नाही. आता परळी ताब्यात घेणं हेच त्यांचं लक्ष आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- चार कानशिलात म्हणजे छळ नाही, वकिलाच्या विधानावर महिला आयोग संतप्त, बार कौन्सिलला पत्र
- नेपाळपर्यंत पळाला पण वाचू शकला नाही! निलेश चव्हाणला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- वादानंतर धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय! पंकजा मुंडेंनी दिली मोठी प्रतिक्रिया