Share

वादानंतर धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय! पंकजा मुंडेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

Dhananjay Munde seeks peace at Igatpuri Vipassana Centre. Pankaja Munde supports his decision. She also demands justice in Vaishnavi case.

Published On: 

Pankaja Munde indirectly target Dhananjay Munde

मुंबई | प्रतिनिधी – राजकीय वाद, मंत्रीपदाचा राजीनामा आणि गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेले धनंजय मुंडे सध्या सार्वजनिक जीवनापासून दूर राहून मन:शांतीच्या शोधात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात आहेत. मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचं खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं.

या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे. मन:शांती मिळवण्याचा हा मार्ग निश्चितच सकारात्मक आहे.” त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Dhananjay Munde at Vipassana Centre; Pankaja Munde Calls It Right Step

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “वैष्णवीला न्याय मिळायलाच हवा. महिला आयोगाने तक्रारींची दखल घ्यायला हवी आणि पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.” पुण्यात पंकजा मुंडे यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यांनी प्लास्टिकमुक्त भारत आणि अहिल्याबाई होळकर यांची ३००वी जयंती या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही