Share

राष्ट्रवादीचे विलिनीकरण थांबवलं… पण का? संजय राऊतांनी सांगितली ‘ती’ खरी कारणं!

Sanjay Raut says Sunil Tatkare won’t allow NCP faction merger fearing loss of post; adds ruling alliance in Maharashtra has deep internal disconnect.

Published On: 

Sharad Pawar claimed that Sanjay Raut was arrested not for the Patra Chawl case, but due to his fearless writings. He said the misuse of power is clearly seen and urged people to read the book seriously.

🕒 1 min read

मुंबई, प्रतिनिधी: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार गट यांच्यातील संभाव्य विलिनीकरणावर खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांना संभाव्य ‘केंद्रीय मंत्री’ पदाची भीती असल्यामुळे हे विलिनीकरण होणार नाही,” असा थेट आरोप राऊतांनी केला आहे.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “अजित पवार गट एकीकडे म्हणतो की शरद पवार हेच आमचे नेते आहेत, आम्हीच मूळ पक्ष आहोत. पण जेव्हा एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा पावले मागे घेतात. तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी स्वतःचा फायदा बघून विलिनीकरण रोखलं आहे. याचा अर्थ ‘मोदींच्या मुख्य दुकानासोबत’ आपले राजकारण चालवायचे आहे.”

Sanjay Raut says Sunil Tatkare won’t allow NCP faction merger

राऊत यांनी प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांनाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, “प्रफुल पटेल महान नेते नाहीत आणि तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण विलिनीकरण झाल्यास त्यांच्या पदांवर गदा येईल. म्हणूनच हे विलिनीकरण थांबवले जात आहे.”

तसेच राऊत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये संपर्काचा अभाव असल्याचं सांगितलं. “फडणवीस, शिंदे आणि अजित पवार एकत्र नाहीत. शिंदे एका बेटावर, अजित पवार दुसऱ्या टोकाला आणि फडणवीस वेगळ्याच दिशेने आहेत. हा संवाद कोमात गेला आहे,” अशी जहाल टीका राऊतांनी केली.

तसेच महिला आयोगाच्या नियुक्त्यांवरही त्यांनी भाष्य करत, “महिला आयोगावर राजकीय नेत्यांच्या जवळच्या महिलांना नोकऱ्या दिल्या जातात. पण हे आयोग अराजकीय असावेत,” असं मत मांडलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही