🕒 1 min read
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात (NCP Sharad Pawar) सध्या अंतर्गत वाद पेटला आहे. जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्याविरोधात पक्षातील युवा आमदारांचा रोष वाढताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी संघटनात्मक फेरबदल करताना आपल्या जवळच्या लोकांनाच प्रमुख पदांवर नियुक्ती दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे पक्षात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे.
विशेषतः युवा आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये ही नाराजी अधिक तीव्र असून, आपली ही नाराजी थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानी नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित होते. या बैठकीत पक्षातील वाद मिटवण्यासाठी आणि नाराजगटाची समजूत काढण्यासाठी चर्चा झाली.
Young NCP MLAs Rebel Against Jayant Patil
दरम्यान, येत्या 10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्याआधी पक्षात काही महत्त्वाचे बदल, नव्या नियुक्त्या किंवा जबाबदाऱ्या फेरवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांच्या गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरून मतभेद असल्याचेही समोर येत आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे वरिष्ठ नेते या विलिनीकरणास विरोध करत असून, हा निर्णय पक्षासाठी धोका ठरू शकतो अशी चर्चा रंगली आहे.
प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चर्चा सध्या सुरु आहे. अशा परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी गटांचे एकत्र येणे हा त्यांच्यासाठी राजकीय धोका ठरू शकतो. त्यामुळेच ते या विलिनीकरणास विरोध करत असल्याचं बोललं जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- घटस्फोटाच्या आदल्या रात्री काय घडलं? मलायका अरोराचा मोठा खुलासा
- अजित पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिटकले आहेत- ओबीसी नेते लक्ष्मण हाके
- GT vs MI: एलिमिनेटरमध्ये ‘करो या मरो’ची लढत; मुंबई की गुजरात, कोण मारणार बाजी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now