🕒 1 min read
मुंबई – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. एका जाहीर सभेत बोलताना हाके म्हणाले की, “अजित पवार हे गोचिडासारखे अर्थ खात्याला चिटकून बसले आहेत. त्यांचं राजकारण सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असं आहे. ते सामाजिकदृष्ट्या असंवेदनशील आहेत.”
हाके यांनी धनगर समाजाच्या विकासासाठी असलेल्या निधीवर अजित पवार यांनी अडथळा आणल्याचा आरोप केला. यावर मुख्यमंत्री जर काही कारवाई करत नसतील, तर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ओबीसी समाजातूनच असेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
OBC leader Laxman Hake criticizes Ajit Pawar
पुढे हाके यांनी शरद पवार यांच्या कुटुंबावरही हल्ला चढवला. “पवार कुटुंब मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना रसद पुरवत असेल आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस त्यांचे कौतुक करत असतील, तर हे आम्हाला कदापिही मान्य नाही,” असं हाके म्हणाले.
आम्ही भाजपाला पाठिंबा दिला कारण त्यांनी आमच्या ओबीसी समाजाच्या मुद्द्यांना स्थान दिलं. आता मुख्यमंत्रीही ओबीसीच असावा अशीच आमची मागणी असल्याचे हाके यांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय शिरसाटांचा संताप! “रात्रीची दारू उतरलेली नसेल…” राऊतांवर घणाघात
- “शिंदे आणि अजितदादा दोघंही संवादात कमजोर!” – फडणवीसांचा रोखठोक दावा
- ‘माझी औकात नाही, म्हणत कुणाल कामराने मुख्यमंत्र्यांना सुनावलं; राज्यात शो घेणार असल्याची घोषणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








