🕒 1 min read
मुंबई– राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadnavis ) यांनी केलेले वक्तव्य चांगलंच गाजत आहे. ‘एक्स्प्रेस अड्डा’ या खास कार्यक्रमात सहभागी झालेल्या फडणवीस यांना विचारण्यात आलं की, “शिंदे आणि अजितदादा – कोण संवादात चांगलं?”
त्यावर हसत उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “दोघंही संवाद साधण्यात फारसे चांगले नाहीत आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्या. पुढे ते म्हणाले, “मी जे मत मांडलं, त्याबद्दल त्यांना वाईट वाटू नये, अशी आशा आहे. आणि ते मला माफ करतीलही.”
Devendra Fadnavis Says Pawar and Shinde Poor at Communication
या विधानानंतर महायुतीतील अंतर्गत कुरबुरी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य चार भिंतींच्या आत करायला हवं होतं. दोन्ही उपमुख्यमंत्री पक्षात आणि सरकारमध्ये संवाद ठेवूनच काम करतात. अशी विधाने संभ्रम निर्माण करतात.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘माझी औकात नाही, म्हणत कुणाल कामराने मुख्यमंत्र्यांना सुनावलं; राज्यात शो घेणार असल्याची घोषणा!
- कोणत्याही गुन्हेगाराला रस्त्यावर फिरू देणार नाही – संजय शिरसाट यांचा इशारा
- सरकारी नोकरी हवीये? SBI मध्ये 2964 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now