Share

‘माझी औकात नाही, म्हणत कुणाल कामराने मुख्यमंत्र्यांना सुनावलं; राज्यात शो घेणार असल्याची घोषणा!

Comedian Kunal Kamra mocks CM Fadnavis, says “If I’m irrelevant, ignore me” – Announces shows across Maharashtra.

Published On: 

Comedian Kunal Kamra mocks CM Fadnavis, says “If I’m irrelevant, ignore me” – Announces shows across Maharashtra.

मुंबई – स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक्स (Twitter) वरून एक टोमणा मारला आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यामुळे कामराविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शोच्या ठिकाणी तोडफोड केली होती.

सद्याच्या पोस्टमध्ये कुणाल कामराने लिहिलं, “माझी औकात नसेल, तर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा. माझा शो 4 लोकं बघत नसतील तर मला इतकं महत्त्व का?” असं म्हणत त्याने फडणवीस आणि शिंदेंवर निशाणा साधला.

Kunal Kamra Slams CM Fadnavis

कामराने जाहीर केलं आहे की तो ऑक्टोबर महिन्यात नाशिक, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये शो घेणार आहे. कुणाल कामराच्या आगामी शोवर त्याचे राजकीय विधान कितपत परिणाम करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install