Share

Kunal Kamra Controversy : कुणाल कामराचं ‘ते’ वक्तव्य ठरलं वादग्रस्त! अडचणीत वाढ

जंतरमंतर येथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या श्रीरामांवरील टिप्पणीवरून नवीन वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Published On: 

Kunal Kamra

Kunal Kamra Controversy : NEET पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असूनही, ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यांनी जंतरमंतर येथील आंदोलनस्थळी भेट दिली. परंतु तिथे केलेल्या एका विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. कामरा यांच्यावर हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. तसेच, कामरा यांच्या विधानानंतर टाळ्या वाजवताना दिसल्यामुळे अभिजित दिपके यांच्यावरही टीका होत आहे.

सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून जंतरमंतर येथे उपोषणावर आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेते आणि कलाकारांनी त्यांची भेट घेतली आहे. बुधवारी कुणाल कामरा जंतरमंतर येथे पोहोचले आणि त्यांनी आपल्या विशिष्ट ‘स्टँड-अप कॉमेडी’ शैलीत भाष्य केले. मात्र, एका विशिष्ट टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला.

मोदी सरकारवर निशाणा साधताना, कामरा यांनी प्रशासनावर अंबानींसाठी काम करत असल्याचा आरोप केला. मात्र, भगवान श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर जाणीवपूर्वक हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे.

“सध्याचे सरकार जे काही करत आहे ते अनेक वर्षांपासून करत आहे. आपण पाहिले आहे की, हे लोक ‘सीतामातेच्या पतीचं नाव घेऊन नीताच्या पतीसाठी काम करत आहेत,” असे कामरा म्हणाला. भगवान श्रीरामांचा उल्लेख थेट देवतेच्या नावाने करण्याऐवजी केवळ “सीतेचे पती” असा केल्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही