Share

कोणत्याही गुन्हेगाराला रस्त्यावर फिरू देणार नाही – संजय शिरसाट यांचा इशारा

Guardian Minister Sanjay Shirsat met the Police Commissioner of Chhatrapati Sambhajinagar to review the Amol Khotkar encounter after the recent robbery. Citizens raise questions on the police action.

Published On: 

Sanjay Shirsat allegation MVA on Nagpur violence

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर – शहरात अलीकडेच मोठा दरोडा घडल्यानंतर संशयित आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आलं असून नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, हे एन्काऊंटर का केलं? कशासाठी?

या पार्श्वभूमीवर आज शहराचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन या घटनेचा आणि संपूर्ण गुन्हेगारी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी एन्काऊंटरची कारणमीमांसा, गुन्हेगारीवरील नियंत्रणाचे उपाय याबाबत सविस्तर माहिती घेतल्याचं सांगितलं.

Sanjay Shirsat reviews Amol Khotkar encounter

शिरसाट यांनी स्पष्ट केलं की, “शहरात कुठलाही गुन्हेगार रस्त्यावर दिसणार नाही, त्याला जेलमध्येच ठेवण्यात येईल. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”

शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांच्या कार्यपद्धतीचा आणि धोरणांचा आढावा घेण्यात आला असून, लवकरच त्याचे परिणाम दिसतील, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!